ताज्या घडामोडी

*तपासणी पथकाकडून 11 लाखाची रोकड जप्त*

 

गडचिरोली दि.15 : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाद्वारे काल रात्री दोन प्रकरणात एकूण 11 लाख 100 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 16 मार्च पासून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पुर्ण होण्याच्या तारखेपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असून व्हिडिओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
भरारी पथक क्रमांक 126801 यांना 14 एप्रिल रोजी रात्रो 9.30 वाजता शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली जवळील, महादेव मंदीराचे समोर नाकाबंदी दरम्यान एक पांढऱ्या रंगाची व्हेन्यु हुडाई कंपनीचे चारचाकी वाहनात रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली. याबाबत वाहनचालकाला समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या निर्देशानुसार भरारी पथक प्रमुख खेमराज लेगनुरे यांनी सदर रकम जप्त केली. पंचासमक्ष वाहनाच्या मागील सीटवर असणाऱ्या काळया बॅग उघुन पाहणी केली असता, सदर बॅगमध्ये एकूण 10 लाख 100 रुपये आढळले. सदर रकम जप्त करुन वाहनचालकास जप्ती पावती देण्यात आली. व सदर रक्कमेबाबत असणाऱ्या आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे समक्ष प्राधिकाऱ्यांकडे हजर करण्याबाबत सुचना देण्यात आली.
यानंतर लगेचच याच ठिकाणी रात्रो 9.50 वाजताचे सुमारास एक पांढऱ्या रंगाची फोर्ड कंपनीचे चारचाकी वाहनाचे समोरील डिक्कीत एक लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. सदर रकम घराचे बांधकामाकरिता भाऊकडून आणली असल्याचे सांगण्यात आले. परंतु सदर रोख रक्कम बाबत खात्री करणे गरजेचे असल्याने भरारी पथकाद्वारे सदर रकम जप्त करून आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वरील दोन्ही प्रकरणात तपास सुरु असल्याची माहिती आदर्श आचारसंहिता समितीचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिली आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button