गडचिरोलीत लॉयड्सतर्फे ‘जीडीपीएल’चा थरार, माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा शुभारंभ

गडचिरोलीत लॉयड्सतर्फे ‘जीडीपीएल’चा थरार,
माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा शुभारंभ, एस.एस. खांडवाला यांची माहिती
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडतर्फे गडचिरोली डिस्ट्रिक प्रीमीअर लिगचा थरार बुधवार ५ फेब्रुवारीपासून गडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्सस्थित एमआयडीसी पटांगणावर रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू तथा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री येणार असल्याची माहिती लॉयड्सचे कार्यकारी संचालक एस. एस. खांडवाला यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक खेळाडूंना त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडकडून गडचिरोली डिस्ट्रिक प्रीमीअर लिगचे आयोजन यावर्षी करण्यात आले आहे. या लिगमध्ये जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील संघ, पोलीस, वन आणि महसूल विभाग तसेच लॉयड्स मेटल्सचा संघ सहभागी होत आहेत. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू तथा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे. पहिला सामना सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. या लिगमधील सामने दिवस व रात्रकालिन असल्याची माहिती एस. एस. खांडवाला यांनी दिली. या लिगसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आलेली खेळपटी आंतरराष्ट्रीय खेळपटीनुसार तीन खेळपट्या तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू व क्रिकेटप्रेमींना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती खांडवाला यांनी दिली. या लिगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. उद्घाटनानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा मार्च पास्ट होणार आहे. पहिला सामना दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर दुसरा सामना सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत होणार असल्याचेही खांडवाला यांनी सांगितले.
फोटो : व लोगो