*आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर घेणार आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य सेवांचा आढावा : ११ डिसेंबरला नागपूरात राज्यस्तरीय बैठक*
गडचिरोली 10– अमरावती, नंदुरबार, पालघर आणि गडचिरोली या राज्यातील आदिवासी व अतिदुर्गम जिल्ह्यांतील आरोग्य सेवांची स्थिती, सुविधा आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मंत्री महोदय यांनी केलेल्या जिल्हा भेटीदरम्यान दिलेल्या सुचनांवरील कार्यवाही, अनुपालन अहवाल आणि पुढील सुधारात्मक पावले या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे व आढावाही घेतला जाणार आहे , ही बैठक समिती सभागृह, उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय, माता कचेरी, दिक्षाभूमी परिसर, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे .
या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव , आयुक्त तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान , संचालक आरोग्य सेवा मुंबई , संचालक आरोग्य सेवा पुणे ,उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग ,सर्व सहसंचालक ,अधिक्षक अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई , उपसंचालक अकोला , ठाणे ,नागपूर, सहायक संचालक , राज्य रक्त संक्रमण परिषद , तसेच अमरावती, नंदुरबार, पालघर आणि गडचिरोली येथील जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ,आर.सी.एच अधिकारी, सिकलसेल समन्वयक आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.



