ताज्या घडामोडी
शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी

गडचिरोली दि.१७ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (फार्मर आयडी) आता अनिवार्य करण्यात आला असून फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ जलद, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, मात्र अजूनही काही शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत, त्यांनी तातडीने ही नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
ही नोंदणी https://mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर करायची असून यासाठी ग्राम कृषि संजीवनी समिती, आपले सेवा केंद्रे आणि कृषी सहाय्यक यांची मदत शेतकऱ्यांना घेता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी कळविले आहे.