ताज्या घडामोडी

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्याच्या वर गेली पाहिजे – नाम. विजय वडेट्टीवार

मुंबई दि.२५ – आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्याच्या वर गेली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे ओबीसी, बहूजन कल्याण,मदत व पुनर्वसन मंत्री नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ओबीसी व्हिजेएनटी बहूजन परिषदेत केले.
ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी बहूजन परिषद यशवंतराव चव्हाण सेन्टर मुबई येथे आज पार पडली. या
परिषदेत राज्यातील हजारो नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींचे हक्क मिळविण्यासाठी आपल्या एकतेची ताकद दाखविणे आवश्यक आहे.
यासाठी येत्या २५ मार्चला सांगली येथे ओबीसी व्हिजेएनटी बहूजन परिषदेचे राज्यस्तरीय १ ले अधिवेशन घेण्यात येईल अशी घोषणा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button