लायड्स च्या प्रकल्पावर आधारित छोटे उद्योग उभारण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे – बी. प्रभाकरन
*बी. प्रभाकरन यांना गडचिरोली प्रेस क्लब चा "गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार" प्रदान*

गडचिरोली दि.३१ – गडचिरोली जिल्हयात देवाने विपुल खनिजसंपत्ती दिली आहे त्याचा वापर करून जिल्हयात मोठा लोहप्रकल्प उभारण्यात येत आहे जिल्हयातील नागरिकांनी यावर आधारित छोटे उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे असे आवाहन लायड्स मेटल अँड एनर्जी चे मॕनेजिंग डायरेक्टर श्री बालसुब्रमन्यम प्रभाकरन यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यासाठी उत्कृष्ठ काम करणा-यांना गडचिरोली प्रेस क्लब तर्फे पत्रकार दिनी दिला जाणारा *गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार” लायड्स मेटल अँड एनर्जी चे मॕनेजिंग डायरेक्टर श्री बालसुब्रमन्यम प्रभाकरन यांना आज ६ जानेवारी २०२४ रोजी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या सभागृहात सायंकाळी आयोजित एका शानदार समारंभात हा पुरस्कार राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नाम. धर्मरावबाबा आत्राम व सहकार महर्षी श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे हस्ते व खासदार श्री अशोकराव नेते, आमदार डाॕ. देवरावजी होळी, आमदार श्री कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेस क्लब चे अध्यक्ष श्री नंदकिशोर काथवटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.