विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा – गडचिरोली : “१ मे” विदर्भवाद्यांनी पाळला काळा दिवस

१ मे १९६० ला विदर्भातील जनतेची जनभावना दुर्लक्षीत करून बळजबरीने विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करून घेतले तेव्हा पासुन कधी काळी एका राज्याची राजधानी असलेल्या विदर्भाची अधोगती सुरु आहे. बेरोजगारी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या , सिंचन ,तंत्र शिक्षण , आरोग्य सेवा , दळण वळणाच्या बाबतीत विदर्भातील जनता त्रस्त आहे. विदर्भातील उच्च शिक्षित युवक आणि मजुर वर्ग रोजगारा करिता मागिल अनेक वर्षा पासून विदर्भाच्या बाहेर पर राज्यात जात आहे. त्या मुळे विदर्भातील १ लोकसभा क्षेत्र आणि ४ विधानसभा क्षेत्रातील प्रतीनिधीत्व कमी झाले आहे. गोसेखुर्द सारखा प्रकल्प ४० वर्ष होऊन सुद्धा अपूर्ण आहे. जिल्हातील कारवाफा, तुलतुली , चेन्ना या सारखे सिंचन प्रकल्प वन कायद्यामुळे अडलेले आहेत .या करिता सरकारची विदर्भ विरोधी भूमिका जबाबदार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्या करिता विदर्भ राज्य आंदोलन समिती मागिल १२ वर्षा पासुन सातत्याने आंदोलने करित आहे. या वर्षी सुद्धा गडचिरोली येथील हुतात्मा स्मारकासमोर विदर्भवाद्यांनी १ मे हा काळा दिवस पाळून काळी फीत लावून विदर्भ राज्य निर्मिती च्या घोषणा देऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रसरकार व राज्य सरकारच्या विदर्भ राज्य विरोधी भूमिकेचा निषेध केला आहे. या निषेध आंदोलनात जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे , उपाध्यक्ष रमेश उप्पलवार , जिल्हा सचिव गोवर्धन चव्हाण , तालुका उपाध्यक्ष वेणुदास वाघरे , माजी जि.प. अध्यक्ष समय्या पसुला , जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर , उपाध्यक्ष गुरुदास भोपये , जेष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली , मराठा सेवा संघाचे पांडुरंग नागापूरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते .