ताज्या घडामोडी

*जिल्हा व तालुका प्रशासनाकडून अवैध गौनखनिज बाबत उपाययोजना*

गडचिरोली – सध्या गडचिरोली तालुक्यात कठाणी नदीवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मौजा अडपल्ली येथे शेतीमधील मातीमिश्रित रेती निष्काषनाची परवानगी दिनांक 27 मार्च 2025 पासून देण्यात आली आहे. सदर घाटावरून नियमाप्रमाणे निष्काषन व वाहतूक सुरू आहे. व सद्या नदीला पाणी आल्यामुळे मागील काही आठवडयापासून वाळू निष्काषन बंद आहे.
तसेच कठाणी नदीवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मौजा खुर्सा येथे शेतीमधील मातीमिश्रित
रेती निष्काषणाची परवानगी दिनांक 30 मे 2025 पासून देण्यात आली आहे. आंबेशिवनी येथील शासकीय डेपोला 10 जून पासून उत्खननाची परवानगी थांबवली आहे.
शासकीय डेपोत जवळपास 400 ब्रास रेती साठा उपलब्द आहे.
गडचिरोली तालुक्यात मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एकुण चार चेकपोस्ट कार्यरत असून त्या माध्यमातून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. यात चेक पोस्ट वर 2000 पेक्षा जास्त वाहनांची तपासणी केलेली आहे.
तसेच गडचिरोली तहसिलने 01 एपिल 2025 पासून एकुण 21 वाहनावर कारवाई करून तहसिल कार्यालयात सदर वाहन जमा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे अवैध वाहतूक, रात्रीची होणाऱ्या वाहतूकिवर नियंत्रण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia