ताज्या घडामोडी
*जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभेचे आयोजन 12 फेब्रुवारी रोजी*
गडचिरोली,(जिमाका),दि.10: जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी (बुधवार) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
तरी, भ्रष्टाचारासंदर्भात जनतेच्या काही तक्रारी असल्यास, त्या तक्रारकर्त्यांनी आवश्यक पुराव्यांसह सभेच्या दिवशी विहित वेळेत उपस्थित राहुन सादर कराव्यात, असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती, सदस्यसचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
0000