ताज्या घडामोडी

*मतदान अधिकाऱ्यांची तीसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण*

*मतदान केंद्रनिहाय अधिकारी निश्चित*

गडचिरोली दि.14 : लोकसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीसरी व अंतिम सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यानुसार आता जिल्ह्यातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणते अधिकारी राहतील याची निश्चिती करण्यात आली.
निवडणूक निरीक्षक राहुल कुमार, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर.टेंभूर्णे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, प्रा. रुपेशकुमार गौर, प्रा. ए.झेङ हकीम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे ही प्रक्रीया पूर्ण करण्यात आली.
सरमिसळ प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून 4 हजार 201 पुरूष व 61 महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यातील 10 टक्के मतदान अधिकारी राखीव राहतील. आरमोरी विधासभा मतदार संघात 1339 पुरूष व 19 महिला, गडचिरोली क्षेत्राकरिता 1572 पुरूष व 22 महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता 1290 पुरूष व 20 महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia