ताज्या घडामोडी
*राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु हुसैन गडचिरोली दौऱ्यावर*
गडचिरोली,दि.29(जिमाका): अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे सदस्य जतोथु हुसैन हे 30 जुलै 2024 रोजी गडचिरोली जिल्ह्यात भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता त्यांचे गडचिरोली येथे आगमन होणार असून ते गोंडवाना विद्यापीठ येथे सकाळी ११ वाजता आदिवासी शिक्षक आणि विद्यार्थी व अनुसूचित जमातीच्या संघटनांसोबत चर्चा करतील. दुपारी 12 वाजता गोंडवाना विद्यापीठाचे उप- कुलगुरु आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि इतर जिल्हास्तरीय अधिकारी यांचे समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीस उपस्थित राहतील.
0000