ताज्या घडामोडी

*महसूल दिनानिमित्त नायब तहसिलदारासह कर्मचाऱ्यांचा गौरव*

गडचिरोली :
येथील तहसील कार्यालयात महसूल दिनानिमित्त शनिवारी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सागर कांबडे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार चंदु प्रधान, ज्ञानेश्वर ठाकरे,एस पी शेख, उपस्थित होते. याप्रसंगी नायब तहसिलदार चंदु प्रधान, प्रशांत धात्रक (मंडळ अधिकारी) मोरेश्वर पटले (सहायक महसूल अधिकारी), कु.छाया टेकाम,जेप्रा (ग्राम महसूल अधिकारी), कु.राखी भैसारे (महसूल सहायक), साधना जुमनाके (शिपाई), आणि निखील बांबोडे (निवडणूक ऑपरेटर) यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्ष सागर कांबडे यांनी महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून जनसामान्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले.
सत्कारमुर्ती चंदु प्रधान ना.तहसिलदार यांचे प्रतिपादन महसूल विभागात जवळपास 57 प्रकारची न्यायिक प्रकरणे चालवली जातात म्हणून मृत्यू पूर्व जवाब, ओळख परेड राष्ट्रीय सण,.तसेच सर्व धर्मात साजरे होणारे सणवार.. महापुरुषांची जयंती पुण्यतिथी , मिरवणूक तसेच इतर धार्मिक बाबीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ह्या विभागाला काम करावे लागतात. शिवाय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय सातबारा उतारा , आठ अ , फेरफार , त्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीत झालेल्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्यांना अनुदान मिळवून देणे.
शेतीचे वाद, अतिक्रमण, पाणंद रस्ते , त्यावरील अतिक्रमण काढणे हे सुद्धा काम ह्याच विभागाकडून होते.

महसुली कर्तव्याशिवाय आज रोजी जवळपास 120 प्रकारची अतिरिक्त कामे ह्या विभागाच्या अंतर्गत केली जातात. अश्यात बहुचर्चित असलेली *पीएम किसान योजना* व *ॲग्रीस्टॅक योजना* यशस्वी करण्यात महसूल विभागाचा आणि त्यात तलाठी, मंडळ अधिकारी यांचे योगदान खूप मोठे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button