*महामाहीम उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था आलापल्ली जिल्हा गडचिरोली यांना आदिवासी क्षेत्रातील राज्यातून उत्कृष्ट संस्था म्हणून प्रथम पुरस्कार*

आज दिनांक 21 मार्च 2026 ला राजभवन मुंबई येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता ह्या कार्यक्रमासाठी महामहिम उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन भारत सरकार, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा,श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन श्रीमती सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, श्री मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य व उद्योजकता विभाग मुंबई श्री राजेश अग्रवाल मुख्य सचिव महाराष्ट्र शासन श्रीमती मनीषा वर्मा अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन श्री सतीश सूर्यवंशी संचालक,व्यवसाय शिक्षण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या उपस्थितीत आदिवासी क्षेत्रातील विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था आलापल्ली जिल्हा गडचिरोली नागपूर विभाग माननीय उपराष्ट्रपती भारत सरकार यांच्या हस्ते उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेनी लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये 78 प्रशिक्षणार्थ्यांना नियमित रोजगार मिळाला आहे उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेंतर्गत जवळपास 3 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली असून जवळपास रुपये 16 लाख इतका एकूण महसूल शासनास प्राप्त झाला आहे.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्था सामाजिक बांधिलकी जपत एनएसएस अंतर्गत भामरागड तालुक्यातील कोठी व पोयरकोठी येथील पूरपीडित अंदाजे 200 घरांचे इलेक्ट्रिफिकेशन करून दिले आहे. संस्थेची उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्थेचे प्राचार्य म्हणून श्री वैभव बोंगीरवार यांनी स्वीकारला त्यांचे सोबत त्याच संस्थेचे आदिवासी वेशभूषेत असलेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

