ताज्या घडामोडी

*मुख्य सचिव राजेश अग्रवाल दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर : विकासकामांचा घेणार सविस्तर आढावा*

गडचिरोली, दि. १९ : राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल हे दिनांक २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील खनिज प्रकल्प, औद्योगिक विकास तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांचे सुरजागड येथे आगमन होणार असून तेथे खनिज परिसर, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) उपक्रम तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता कोनसरीकडे प्रयाण करून १२.४५ वाजता कोनसरी स्टील प्रकल्पाची पाहणी करतील.

दुपारी २.४० वाजता ते मार्कंडा देवस्थान येथे भेट देणार असून, तेथे भारतीय पुरातत्व विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या अधिकाऱ्यांसोबत मंदिर जीर्णोद्धार व घाट विकासाबाबत चर्चा करतील.

सायंकाळी ५ वाजता गडचिरोली येथील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT) येथे पाहणी. त्यानंतर सायंकाळी ५.४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत ग्रामीण विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.

बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन व खनिकर्म विभागाच्या कामांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button