*अ.भा.म.सा. संमेलनात चुडाराम बल्हारपुरे सन्मानित : रानगर्भातील रानफुले* या कवितेचे सादरीकरण.

गडचिरोली –
नुकत्याच सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे प्रथम सत्रात झाडीपट्टीतील नाटककार व
कवी चुडाराम बल्हारपुरे यांना निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आले होते.
संमेलनातील मुख्य मंडपात उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध साहित्यिक व कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात चुडाराम बल्हारपुरे यांनी *रानगर्भातील रानफुले* या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कवितेचे सादरीकरण केले. उपस्थित कवी, साहित्यिक व रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या कवितेला उत्स्फूर्त दाद दिली. कवी संमेलनाचे संचलन प्रसिद्ध कवी प्रा. प्रदिप कांबळे यांनी केले. या कवी संमेलनात विदर्भातील दोन कवींसह संपूर्ण देशातून ३३ प्रसिद्ध कवी उपस्थित होते.
अ.भा.सा.महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलींद जोशी यांचे हस्ते तसेच गुरय्या स्वामी (उपाध्यक्ष), विनोद कुलकर्णी (कोषाध्यक्ष), सुनिता राजे पवार (कार्यवाह), नंदकुमार सावंत (अध्यक्ष म.सा.प. पुणे), अनिल जठार (सदस्य मावळा फाऊंडेशन) व कवी संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर इ.मान्यवर यांचे उपस्थितीत चुडाराम बल्हारपुरे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा. यादव गहाण, प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा.डॉ. योगीराज नगराळे, प्रा. राजेंद्र गोहणे, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, डॉ. दिपक चौधरी, रमेश निखारे, तसेच प्रा. नवनीत देशमुख, राजीव पुजारी, नरेंद्र कदम, मुग्धा बोरकर, सुनील बावणे, प्रदिप देशमुख इ. साहित्यिक तसेच मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.



