*गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी मिलिंद उमरे, तर सचिव पदी शेमदेव चाफले यांची निवड*

गडचिरोली, ता. २९ : पत्रकारीतेच्या क्षेत्रात अग्रेसर गडचिरोली प्रेस क्लब संघटनेच्या शुक्रवार (ता. २६) पार पडलेल्या वार्षिक सभेत नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद उमरे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी युवा राष्ट्रदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी शेमदेव चाफले व उपाध्यक्ष पदावर दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रूपराज वाकोडे यांची निवड करण्यात आली.
प्रेस क्लब भवनात पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रेस क्लबची नवी कार्यकारीणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी मिलिंद उमरे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी शेमदेव चाफले, उपाध्यक्ष पदावर रूपराज वाकोडे , कोषाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, सहसचिव पदावर दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर काथवटे यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्यांमध्ये दैनिक हितवादचे जिल्हा प्रतिनिधी रोहिदास राऊत, लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी निलेश पटले, लोकशाही न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजणे, आदिवासी माणूसचे सुरेश पद्मशाली, नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश नगराळे, गडचिरोली पत्रिकाचे विलास दशमुखे यांचा समावेश आहे. सहयोगी सदस्यांमध्ये नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी विनोद बदखल,
साम टिव्हीचे गणेश शिंगाडे, टीव्ही ९ चे इरफान शेख, पुढारी वृत्तवाहिनीचे अग्रवाल, एनडीटीव्हीचे मनीष रक्षमवार, डी. डी. न्यूजचे ओमप्रकाश चुनारकर, लोकशाही पोर्टलचे संदीप कांबळे आदींचा समावेश आहे. मिलिंद उमरे मागील २३ वर्षांपासून पत्रकारीतेच्या क्षेत्रात असून नुकतेच त्यांना नानासाहेब परूळेकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारीतेसह ते महाराष्ट्रातील सर्वपरीचित निसर्ग अभ्यासक असून गडचिरोली वनविभागाच्या मानद वन्यजीव रक्षक पदावरही कार्यरत आहेत. तसेच माओवाद, आदिवासी संस्कृती, योग, आयुर्वेद आदी विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास असून विविध ठिकाणी त्यांच्या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येते. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिलिंद उमरे यांच्यासह संपूर्ण नव्या कार्यकारिणीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
————————————–



