ताज्या घडामोडी

*गडचिरोली शहराच्या व्हर्टिकल विकासासाठी महत्त्वाची मागणी*

गडचिरोली शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आता हॉरिझाँटल विस्ताराची मर्यादा आली असून आपल्याला व्हर्टिकल डेव्हलपमेंटकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी गडचिरोली चे आमदार डा. मिलिंद नरोटे यांनी विधानसभेत केली.

🔸 धानोरा रोड, चामोर्शी रोड पलीकडे संपूर्ण जंगल क्षेत्र
🔸 नागपूर रोडच्या पुढे नदीमुळे मर्यादित जागा
🔸 शहराचा विस्तार थांबू नये म्हणून नवीन दिशा – व्हर्टिकल फेसिंग डेव्हलपमेंट

व्हर्टिकल विकास सुलभ करण्यासाठी सर्वात मोठी गरज, शहरातील फर्स्ट व सेकंड फ्लोरवरून जाणाऱ्या ओव्हरहेड केबल्स आता अंडरग्राउंड करणे अत्यावश्यक आहे. वरून जाणाऱ्या वायरमुळे इमारतींचा विकास अडकतो, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, शहराच्या आधुनिक विकासाला अडथळा

हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये आमदार नरोटे यांनी शासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की — गडचिरोली शहरातील सर्व ओव्हरहेड केबल्स अंडरग्राउंड करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करण्यात यावा.

गडचिरोलीच्या भविष्याचा विचार करून घेतलेले हे पाऊल आपल्या शहराला आधुनिक, सुरक्षित आणि प्रगत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button