महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीवर कोणतीही स्थगिती आणलेली नाही.
महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीवर कोणतीही स्थगिती आणलेली नाही.निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्ही तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करु असं सांगितलं आहे.
तेलंगणात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने, उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली. महाराष्ट्रातही मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने, निवडणुकांवर स्थगिती येणार का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्यातील निवडणुकीला स्थगिती दिली नसल्याने, ठरल्या वेळेत पार पडणार आहेत.



