ताज्या घडामोडी

*आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; अर्जाची अंतिम तारीख १५ जुलै*

गडचिरोली, (जिमाका) दि. ३१ मे २०२५: जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता विविध उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्पातून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनांमध्ये बेरोजगार आदिवासी युवक-युवतींसाठी विविध व्यवसायांसाठी आर्थिक मदत, शेतकऱ्यांसाठी ताडपत्री, स्प्रे पंप, काटेरी तार, मोहफुल-निंबोळ्या जमा करण्यासाठी जाळी, थ्रेशर मशीन, फळबाग लागवडीसाठी साहित्य, तसेच मत्स्यसंवर्धनासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी ८५ टक्क्यांपर्यंत व काही बाबतीत १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

तसेच सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी शेत सपाटीकरणासारख्या योजनांचा समावेश असून, महिला बचत गटांसाठी देखील विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. अर्जदारांकडून अनुसूचित जमातीचा दाखला (उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह), रहिवासी दाखला, चालू वर्षातील उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार स्वाक्षरीसह), ग्रामसभा ठराव, आधार कार्ड, आधार लिंक असलेल्या बँक खात्याची छायांकित प्रत, व इतर संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत. विधवा, परित्यक्त्या, अपंग आणि वनहक्क पट्टाधारक लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रमाणपत्रांची मागणी करण्यात आली आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी www.nbtribal.in या अधिकृत पोर्टलवर दिनांक १५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, तसेच अधीक माहितीकरिता संबंधित प्रकल्प कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia