ताज्या घडामोडी

२२ लाखाचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी पोलिसांनी केले ठार

भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबविण्या करीता रवाना करण्यात आले. सदर माओवादविरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येण्यासाठी सांगितले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानानी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर १ पुरुष व २ महिला नक्षलवादी मृत अवस्थेत आढळले असुन सदर मृतक नक्षल्याची ओळख पटली आहे.
१) वासु समर कोरचा, रा. गोडीया, पूर्व बस्तर एरीया (छ.ग.) (डीव्हीसीएम)
कमांडर, पेरमिली दलम,
२) रेश्मा मडकाम, वय २५ वर्षे, रा. बस्तर एरीया (छ.ग.) सदस्य,
३) कमला मडावी, वय २४ वर्षे, रा. दक्षिण बस्तर एरीया (छ.ग.) सदस्य, पेरमिली दलम.

  1. घटनास्थळावरून पोलिसांनी हस्तगत केलेले साहित्य
    ¶¶¶
    सदर घटनास्थळावरुन १ नग एके ४७ रायफल,१ नग कार्बाइन रायफल, १ नग इन्सास रायफल व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia