ताज्या घडामोडी
विदर्भवादी १ मे रोजी ‘काळा दिवस’ पाळणार

महाराष्ट्रवाद्यांतर्फे १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करत असताना विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे १ मे रोजी विदर्भातील संपूर्ण ११ ही जिल्ह्यात ‘काळा दिवस’ ‘(black day’) पाळला जाणार आहे. १ मे रोजी दुपारी १२ वाजता विदर्भवादी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयापुढील महापुरुषांच्या पुतळ्यापुढे उपस्थित राहतील. यावेळी विदर्भवादी काळ्या पट्ट्या लावतील किंवा काळा गणवेश घालतील. यानंतर घोषणा देऊन महाराष्ट्र दिनाचा निषेध करतील. नागपुरातील हे आंदोलन व्हेरायटी चौकात सीताबर्डी होणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आले.