‘ *नाट्यश्री’ च्या वाङ्मय पुरस्कारासाठी देश, विदेशातून गडचिरोलीत साहित्यिकांची मांदियाळी*

*साहित्य कला मंच तर्फे वाङ्मय पुरस्कार सोहळा व काव्य संमेलन
*इंग्लंड, गोवा, बुऱ्हाणपूर, बंगलोर येथील साहित्यिकांचाही समावेश
गडचिरोली:
नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजित महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार सोहळा तसेच कवी संमेलनासाठी राज्यभरातून तसेच देश विदेशातून साहित्यिकांची मांदीयाळी ७ डिसेंबर रोजी गडचिरोली अवतरली होती. यावेळी मान्यवारांच्या हस्ते राज्यातील विविध साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आला.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात नाट्यश्री कला मंच तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य एस.एन. पठाण,तर प्रमुख अतिथी म्हणून झाडीपट्टीतील जेष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर,ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक व कवयित्री उषाकिरण आत्राम,ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक व आदिवासी साहित्यिक नीलकांत कुलसंगे, नागपूर येथील पत्रकार विनोद देशमुख, झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे, ज्येष्ठ रंगकर्मी दादा चुधरी आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य एस एन पठाण सर यांनी आपले अध्यक्षीय भाषणात गडचिरोली येथे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून प्रत्यक्ष विजेते स्पर्धक येथे उपस्थित राहणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आले. चांदा ते बांदा सर्व पुरस्कृत साहित्यिक यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व अक्षरधन देवून गौरविण्यात आले.
या प्रसंगी चुडाराम बल्हारपुरे संपादित ‘जोडीदार’ या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे व ॲड.पी. डी. काटकर लिखीत आमुचा भारत महान, नारी रत्नांची खाण या पुस्तकांचे विमोचन देखील करण्यात आले.
*कादंबरी विभाग* :प्रथम क्रमांक लेखिका अर्चना देव बुलढाणा,द्वितीय क्रमांक भ.पु. कालवे संभाजीनगर, तृतीय क्रमांक डॉ. वसुधा वैद्य नागपूर. *कथासंग्रह विभाग*: प्रथम क्रमांक डॉ. सुनील विभुते बार्शी, द्वितीय क्रमांक प्रमोदकुमार अन्नेराव भंडारा, तृतीय क्रमांक प्रा. रसूल सोलापूर महागाव *कवितासंग्रह गजल संग्रह विभाग* : प्रथम क्रमांक सिराज करीम शिकलगार आंधळी, द्वितीय क्रमांक गझलकार दिलीप सिताराम पाटील राजुरा, कवितासंग्रह विभागातून प्रथम क्रमांक डॉ.सुनील श्रीराम पवार मेहकर, द्वितीय क्रमांक यादव गावडे बऱ्हाणपूर, तृतीय क्रमांक स्मिता जडे दामाजी नगर, *समीक्षा विभाग*: यामध्ये प्रथम क्रमांक रमेश पोफळी पुणे, द्वितीय क्रमांक डॉ. विनोद राऊत बोरगाव मेघे, तृतीय क्रमांक प्रा. डॉ. माधव कांडणगिरी
*संशोधन ग्रंथ पुरस्कार*: प्रथम प्रथम क्रमांक डॉ. अनुराग श्रीकांत लवेकर बंगलोर,द्वितीय क्रमांक राजीव गजानन पुजारी सांगली, तृतीय क्रमांक डॉ. दत्ताराम राठोड अमरावती.
*नाटक विभाग* : प्रथम क्रमांक डॉ. विजयकुमार देशमुख गोरेगाव पूर्व मुंबई,द्वितीय क्रमांक राजरत्न पेटकर वरोरा, *आत्मचरित्र विभाग*: प्रथम क्रमांक डॉ.राजश्री शिरभाते इंग्लंड युके,द्वितीय क्रमांक भारत सातपुते लातूर, तृतीय क्रमांक डॉ. नंदकुमार राऊत नवीन पनवेल,
*चरित्र ग्रंथ विभाग*: प्रथम क्रमांक सुनील पांडे,द्वितीय क्रमांक अनिल शेवाळकर शेवाळा जिल्हा हिंगोली.
*ललित लेख विभाग*: प्रथम क्रमांक मुग्धा शेखर बोरकर फोंडा गोवा,द्वितीय क्रमांक डॉ.नरेश नरेंद्र भिकाजी कदम खारघर मुंबई.
*वैचारिक लेख*: प्रथम क्रमांक अनिल पाटील अलिबाग जिल्हा रायगड,द्वितीय क्रमांक सत्यवान मंडलिक वाळवा जिल्हा सांगली.
*बालसाहित्य विभाग*:
प्रथम क्रमांक डॉ. मानसी मंगेश कोळते व डॉ.संजय जानराव ढोबळे,द्वितीय क्रमांक गणेश शिवराम भाकरे सावनेर. *आत्मकथन विभाग*:
प्रथम क्रमांक अजित देशमुख सानपाडा नवी मुंबई,द्वितीय क्रमांक आनंद इंदिरा श्रीधर सांडू चेंबूर मुंबई, तृतीय क्रमांक सुनील देसाई कोल्हापूर या स्पर्धक विजेत्यांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोहणे यांनी केले.
पुरस्कार वितरणानंतर मेहकर (बुलढाणा) येथील साहित्यिक डॉ. सुनील पवार यांचे अध्यक्षतेखाली व गडचिरोली येथील ज्येष्ठ कवी रामराम करकाडे यांचे उपस्थितीत कवी संमेलनाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले होते. यावेळी राज्यातील सर्व भागातून आलेल्या ८० कवींनी या कार्यक्रमात आपल्या कविता सादर केल्या. सर्व कवींना सन्मानपत्र व अक्षरधन भेट देण्यात आले.
कविसमेलनाचे सूत्रसंचालन दिलीप मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नाट्यश्री साहित्य कला मंचचे डॉ. दिलीप मेश्राम , दादा चुधरी, प्रा. अरुण बुरे, जितेंद्र वासुदेव उपाध्ये,रमेश गंगाधर निखारे, योगेश गोहणे, प्रा. यादव गहाणे, राजेंद्र जरुरकर, हेमंत कावळे, अशोक सुत्रपवार,सुनील चडगुलवार, निरंजन भरडकर, मारोती लाकडे, सौ. कुंदा बल्हारपुरे, चुडाराम बल्हारपुरे आदी कलावंत तसेच नाट्यश्री साहित्य कला मंचच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.



