
*उद्यापासून तहसिल गडचिरोली येथे सेवा पंधरवाडा*
गडचिरोली – महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळयाच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम,गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत सेवा पंधरवाडा साजरा करावयाचा आहे.या कालावधीत खालील उपक्रम मोहिम स्वरुपात युध्दपातळीवर राबवायाचे आहे.
पहिला टप्पा :- 17 सप्टे. ते 22 सप्टे. 2025 शिवार / पांदन रस्ते मोहीम दुसरा टप्पा :- 23 सप्टे ते 27 सप्टे. 2025 सर्वांसाठी घरे अतिक्रमनधारकांना पट्टे वाटप तिसरा टप्पा :- 10 वी 12 वी च्या विदयार्थ्यांना दाखले वाटप, आपसी वाटणी कलम 85, लक्ष्मीमुक्ती योजना.
सेवा पंधरवाडयात करावयाचे कामाचे उदिष्ठ 1) शासकिय जमीनीवर सन 2011 पूर्वीचे रहीवास प्रयोजनार्थ अतिक्रमीत घरे नियमाकूल करणे. ग्रामीण 127 नागरी 197
एकूण :- 324
2) ग्रामीण रस्ते / पांदन रस्ते, हद्दीचे रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व विशिष्ट क्रमांक देणे गाव नकाशावर असलेले 582 गाव नकाशावर नसलेले 535
एकूण :- 1117
3) महाविद्यालयात / मंडळात कॅम्पचे आयोजन व प्रमाणपत्र वाटप करणे एकूण :-800
4) शेतीची आपसी वाटणी करणे कलम 85 नुसार प्रकरणात सुनावणी घेऊन आदेशाचे वाटप करणे एकूण :-97
5) लक्ष्मीमुक्ती योजनेनुसार 7/12 वर कायदेशिर पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नांव नोद करणे एकूण :-100
असे श्री शुभम पाटील’तहसिलदार गडचिरोली यांनी कळविले आहे.



