ताज्या घडामोडी
*जपतलाई ची आदिवासी आश्रमशाळा बंद करणे योग्य नाही – अंबादास दाणवे*

गडचिरोली दि. 14- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जपतलाई ची आदिवासी आश्रमशाळा शासनाने बंद करू नये असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता श्री अंबादास दाणवे यांनी व्यक्त केले आहे.
नुकतेच विषारी सापाच्या दंशाने मृत्यू पावलेल्या तिन आदिवासी मुलींच्या आश्रम शाळेला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना दाणवे म्हणाले की, आश्रम शाळा बंद करण्याऐवजी प्रशासक नेमावा किंवा अन्य चांगल्या संस्थेला आश्रम शाळा चालविण्यास द्यावी.
