ताज्या घडामोडी
*जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक १५ सप्टेंबरला*
गडचिरोली, दि. १० : जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांच्या तक्रारी तसेच अपील प्रकरणांचे निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर सभा जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी, समस्या आणि सूचना घेऊन वेळेवर सभेला उपस्थित राहावे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अनिकेत पाटील यांनी कळविले आहे.