ताज्या घडामोडी

*सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी 09 जुलै रोजी सभा*


गडचिरोली, दि. 30 जून : गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सभा दिनांक 09 जुलै 2025 (बुधवार) रोजी दुपारी 01.00 वाजता गोंडवाना कला दालन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार दिनांक 13.06.2025 ते 12.06.2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत.

या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या आरक्षण सोडत सभेत गडचिरोली तालुक्यातील एकूण 51 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांचे आरक्षण ठरविले जाणार आहे. यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रातील 34 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण तसेच अनुसूचित क्षेत्रातील 17 ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

सदर आरक्षण सोडत सभा पारदर्शकतेने व नियमानुसार पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी केले आहे.

0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia