ताज्या घडामोडी

*क्रीडा संकुलाची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी*

*जिल्हा क्रीडा संकुल समितीचा आढावा*

गडचिरोली, दि. ३ : जिल्हा क्रीडा संकुलाची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी
दिल्या.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल घेतला तसेच क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा, इनडोअर बॅडमिंटन हॉल, स्विमिंग टॅंक आणि डोम टाईप मल्टीगेम इनडोअर हॉल यासारख्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामांची माहिती घेतली. त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संकुल समितीने कामाची गुणवत्ता तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी, इनडोअर बॅडमिंटन हॉलमधील व्हेंटीलेशन तसेच खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. पंडा यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेली कामे पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button