*नाट्यश्रीचे ‘महामृत्युंजय वाड्.मय पुरस्कार – २०२५ ‘ जाहीर*

गडचिरोली – नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली च्या वतीने आयोजीत ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा- २०२४-२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धा राज्यस्तरीय असली तरी जगभरातून साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात परिक्षकांनी खालील विविध प्रकारच्या ३३ साहित्यांची निवड केली आहे.
*१) कादंबरी विभाग* १) पंजाबची वाघीण – (अर्चना देव, बुलढाणा), २) काडीमोडातील काटे – (भ.पुं.कालवे, संभाजीनगर)३) वारी – (डॉ. वसुधा वैद्य, नागपूर) *२) कथासंग्रह विभागात* १) मिरॅकल – (डॉ. सुनील विभुते, बार्शी) २) झुरळ आणि इतर काही बाही (प्रमोदकुमार अणेराव, भंडारा)३) पठारावरचा दौलती -( प्रा. रसूल सोलापुरे,कोल्हापूर)
*३) कवितासंग्रह विभागात* १) सिझर न झालेल्या कविता – (प्रा. डॉ. सुनील श्रीराम पवार,मेहकर), २) माडिया पिल्लो – (डॉ. यादवराव गावळे, बऱ्हाणपूर, म.प्र.)३) रुजता हलकेच – (सौ. स्मिता जडे, दामाजीनगर)
*४) गझलसंग्रह विभाग* १) दीवान- ए- सिराज – (सिराज करीम शिकलगार, पलूस,जि. सांगली)२) मी शब्दांना मशाल करतो – दिलीप सीताराम पाटील, राजूरा *५) समीक्षाग्रंथ* १) पंडित – काव्य- रसास्वाद (त्रिदल) – (रमेश पोफळी, पुणे) २) नामदेव ढसाळ यांची कविता: आस्वाद आणि चिकित्सा – (डॉ. विनोद राऊत, बोरगाव मेघे) ३) ‘बुढाई’ एक अभ्यास – डॉ. माधव कांडणगिरे, घुग्गुस (जि. चंद्रपूर) *६) संपादन/ संशोधन* १) वसुंधरेचे शोधयात्री – (डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर, बंगलोर) २) अंतराळवेध – (राजीव गजानन पुजारी, सांगली, ३) मराठी तेलुगू भाषिक अनुबंध – (डॉ. दत्ताराम राठोड, अमरावती) *७) नाटक* १) ना ते आपुले -(डॉ. विजयकुमार देशमुख, गोरेगाव (पू), २) परिवर्तन – (राजरत्न पेटकर, (वरोरा) *८) आत्मचरित्र* १) वन वे टिकीट टू यु.के.- (डॉ. राजश्री शिरभाते, इंग्लंड (यु.के.)’ २) जागरण – भारत सातपुते, (लातूर) ३) दौशाड – डॉ. नंदकुमार राऊत, (पनवेल) *९) चरित्रग्रंथ* १) कीर्तनसम्राट बाबामहाराज सातारकर – (सुनील पांडे,नीरा (पुणे) २) ज्ञानसूर्य म्हाइंभट- अनिल शेवाळकर, हिंगोली) *१०) ललीतलेख* १) कोलाज – मुग्धा शेखर बोरकर (फोंडा – गोवा) २) वारी जनातली, जनांच्या मनातली – (डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, खारघर (नवी मुंबई) *११)वैचारिक लेखसंग्रह* १)चोरांची लोकशाही – अनिल शां. पाटील (अलिबाग, जि.रायगड २) स्वातंत्र्याची ७५ वर्षे- (सत्यवान मंडलिक, वाळवा (सांगली) *१२) बाल / कुमार साहित्य* १) गोष्टींतून विज्ञान सुगंध – (डॉ. मानसी मंगेश कोलते, व डॉ. संजय जानराव ढोबळे, नागपूर), २) थेंबा थेंबाची कहाणी – (गणेश भाकरे, सावनेर) *१३) आत्मकथन* १) पोलीस मन – (अजित देशमुख, सानपाडा, नवी मुंबई) २) क्षण.. सोनेरी, रुपेरी आणि काटेरी – (आनंद इंदिरा श्रीधर सांडू, चेंबूर, मुंबई) ३) स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया आणि ‘मी’ अर्थात मृत्युंजय – (सुनील देसाई, भुदरगड (जि. कोल्हापूर) इत्यादी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ०७ डिसेंबरला जि.म. सह. बॅंक, गडचिरोलीच्या सभागृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
– *चुडाराम बल्हारपुरे* (नाटककार)
०००



