*इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली येथे महात्मा गांधी विचार कार्य दर्शन सप्ताह प्रारंभ*

गडचिरोली : एकता सामाजिक शिक्षण संस्था गढ़चिरोली, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंच द्वारे इंदिरा गांधी महाविद्यालय गढ़चिरोली येथे आज १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत महात्मा गांधी विचार कार्य दर्शन सप्ताह आयोजनाचा सुरूवात करण्यात आले.
महात्मा गांधी विचार कार्य दर्शन सप्ताह चे प्रथम दिनी इंदिरा गांधी महाविद्यालय गढ़चिरोली च्या विद्यार्थी प्रतिनिधि द्वारे वरिष्ठ नागरीक वंदन दिवस म्हणून साजरा करतांना पांच वरिष्ठ नागरीक अतिथिचा जल टाकून चरण धुऊन, रूमाल ने पाय पुसून तिलक वंदन व पुष्प टाकून सम्मान करण्यात आले.
कार्यक्रमाची अध्यक्षता महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंच संघटनेचे अंतरराष्ट्रीय संयोजक व संस्थापक विश्व शांतिदूत प्रकाश आर. अर्जुनवार यांनी केले तसेच गडचिरोली प्रेस क्लब चे पुर्व अध्यक्ष व आदिवासी माणूस चे संपादक सुरेश पदमशाली यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधीजींच्या फोटो ला खादी सूत माला घालून केले. त्याचप्रमाणे मुख्य अतिथि वरिष्ठ नागरिक संगठन चे अध्यक्ष श्री पांडुरंग घोटेकर, विशेष अतिथी श्री पंडित पुडके, प्रमुख अतिथि नक्टूजी चिमूरकर, जीवन मडावी, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विचार मंचाचे गांधी – आंबेडकर विचार प्रकोष्ठ जिला संयोजक प्रा. राजन बोरकर व महाविद्यालय छात्र प्रतिनिधि संचित कड़वे प्रामुख्याने उपस्थित होते.
महात्मा गांधी च्या नैतिक मूल्यांचा शपथ संकल्प अभियान राबवून शाला महाविद्यालय तथा गावा – गावात प्रचार प्रसार करण्याचा सर्वानी शपथ घेऊन संकल्प घेण्यात आले.
महात्मा गांधी विचार कार्य दर्शन सप्ताह अंतर्गत
1 अक्टूबर : वरिष्ठ नागरिक वंदन दिवस
2 अक्टूबर : गांधी जयंती सत्याग्रह शपथ संकल्प अभियान
3 अक्टूबर : गांधी निबंध स्पर्धा दिवस
4 अक्टूबर : गांधी चित्रकला स्पर्धा
5 अक्टूबर : मन स्वच्छ – तन स्वच्छ – सारा जहां स्वच्छ अभियान
6 अक्टूबर : महात्मा गांधी विषपर विघार्थी भाषण
7 अक्टूबर : गांव की ओर चलो ( खेडा कडे चला ) विश्रामपुर येथे पौधारोपण कार्य
8 अक्टूबर : महात्मा गांधी ची प्रासंगिकता पर विचार संगोष्ठी व सप्ताह आणि सप्ताह समापन।
कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रा. राजन बोरकर, संचालन कु. गायत्री पुराम तथा प्रा. विशाल भांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.



