ताज्या घडामोडी

*धान्य खरेदी व साठवण घोटाळ्यांतील दोषींवर कारवाई* *जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर*

गडचिरोली दि. १० : जिल्ह्यातील तांदूळ खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये झालेल्या विविध अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहारांवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन महिन्यांत अनेक कारवाया करण्यात आल्या असून, दोषींवर निलंबन, विभागीय चौकशी, वसुली आणि गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षक निलंबित करण्यात आले असून, 22.42 लाखांची वसुली सुरू आहे. या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू आहे तसेच ट्रान्सपोर्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.

सिरोंचा येथील 2011 सालच्या धान्य अपहारप्रकरणी 24.8 लाखांची वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

तसेच, आदिवासी विकास संस्था, देऊलगाव (ता. कुरखेडा) येथे 2023-24 मध्ये 3900 क्विंटल तांदळाच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून, 1.53 कोटी रुपयांची वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील धान्य साठ्याची 100 टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 2 एप्रिल रोजी झालेल्या पॅडी होर्डिंग कोऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

2011 मधील धान्य लोडिंग प्रकरणात लादलेल्या 2.67 कोटी रुपयांच्या दंडापैकी 1.35 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित 72 लाख रुपयांची वसुली न करणाऱ्या 13 राईस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू आहे.

धान्य खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या प्रकारांना पायबंद घातला जाईल.” असा इशारा जिल्हा प्रशासनाने यातून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button