ताज्या घडामोडी

सुरजागड लोह खनीजाच्या जड वाहतुकीस गडचिरोली मार्ग बंद करा.

अन्यथा रिपब्लिकन पार्टी आंदोलन करणार , रिपाई - बामसेफ चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

गडचिरोली – सुरजागड लोहखनीजांच्या जड वाहतुक करणारे ट्रॅक गडचिरोली मार्ग धानोरा ते छत्तीसगड जड वाहतुक करीत जातात सदर कंपनीच्या ट्रकामुळे एटापल्ली ते गडचिरोली पर्यंतच्या रोडवर आतापर्यंत निष्पाप १५-२० लोकांचे अपघात करून चिरडून टाकले आहे. सदर कंपनीतील ट्रका जड वाहतुक करतांत क्षमतेपेक्षा जास्त लोहखनीज वाहतुक करणाऱ्या ट्रकाकडे RTO ने लक्ष घ्यावे व अतिवेगाने धावणाऱ्या ट्रकांना नियंत्रित करण्यात यावे.लोहखनीजावर ताळपत्री सुद्धा टाकत नसल्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण होतो. अश्या सुरजागड -कोनसरी लोह खनीजाच्या ट्रकांना शासकिय विज्ञान महाविघ्यालय चामोर्शी रोड ते पोटेगाव बायपास रोड रामनगर ते बसस्टॅड धानोरा या बायपास रोडने वळवावे जेणेकरून अपघात घडणार नाही अन्यता रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली व बामसेफ जिल्हा गडचिरोली च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल व सुरजागड लोह खनिजांच्या ट्रकाच बंद करण्यात येतील अश्या प्रकारचे निवेदन रिपब्लिकन पार्टी व बामसेफ च्या शिष्ठमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्याकडे दिले.
सदर शिष्ठमंडळात रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , रिपाई नेते गोपाल रायपूरे , रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे , रिपाई चामोर्शी तालुकाध्यक्ष विशाल दहिवले (घोट ) माजी नगरसेवक तुळसिराम सहारे ,बामसेफचे प्रमोद राऊत , रिपाई गडचिरोली तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम , सचिव रोशन उके , शहर अध्यक्ष चोखोबा ढवळे , प्रेमदास रामटेके , दामोदर शेंन्डे , शामराव रामटेके सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button