ताज्या घडामोडी

*जिल्हाधिकारी यांचे हस्ते सेवापंधरवाडयाचा शुभारंभ*

गडचिरोली- महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळयाच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम,गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत सेवा पंधरवाडा साजरा करावयाचा आहे.या कालावधीत खालील उपक्रम मोहिम स्वरुपात युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे त्याअनुषंगाने गडचिरोली तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजीत करुन शेत पादंन रस्त्याचे प्रस्ताव मंजूरीबाबत कार्यवाही सर्व ग्राम पंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी व गावातील सरपंच व पदाधिकारी व नागरीकाच्या उपस्थितीत ग्राम सभा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
सेवापंधरवाडा कार्यक्रमाचे अध्यक्ष :- उद्घाटक :- मा.श्री अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी गडचिरोली मा.श्री रणजित यादव,भाप्रसे सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी गडचिरोली, , प्रमुख अतिथी- मा.श्री अरुन भाप्रसे सहायक सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी चामोर्शी, श्री इमरान शेख जिल्हा खनिकर्म अधिकारी, श्री प्राध्या.बारसागडे सर, श्री शुभम पाटील तहसिलदार गडचिरोली हे उपस्थीत होते.
मा.जिल्हाधिकारी यांनी खालील विषयावर सेवापंधरवाडा विषयक मार्गदर्शन केले.
पहिला टप्पा :- 17 सप्टे. ते 22 सप्टे. 2025 ग्रामीण शिवार / पांदन रस्ते मोहीम
दुसरा टप्पा :- 23 सप्टे ते 27 सप्टे. 2025 सर्वांसाठी घरे अतिक्रमनधारकांना पटटे वाटप
तिसरा टप्पा :- 10 वी 12 वी च्या विदयार्थ्यांना दाखले वाटप, आपसी वाटणी कलम 85, लक्ष्मीमुक्ती योजना.

कार्यशाळा मार्गदर्शक :- जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री इमरान शेख यांनी M SAND कृतीम वाळू विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
M SAND WORK SHOP कृतीम वाळू धोरणाची अंमलबजावणी :- गडचिरोली तालुक्यातील सर्व नागरीक, शेतकरी, शेतमजूर , छोटे उद्योजक यांचे जिवनमान उंचाविणे हे प्रशासनाचे उदिष्ट आहे. M sand उद्योग तालुक्यात उभारल्यास नागरिकांना वाळू स्वस्त: उपलब्द होईल. एम सँडची गुणवत्ता नियंत्रीत केली जाते. त्यामुळे ती नैसर्गीक वाळूपेक्षा बांधकाम कामासाठी अधिक उपयुक्त मानली जाते. उद्योग उभारल्यास बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल तसेच नदयाचे प्रदुषण होणार नाही. तथापी पर्यावरणाचे रक्षण होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शुभम पाटील,तहसिलदार गडचिरोली यांनी तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री चंदु प्रधान, नायब तहसिलदार यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित तालुक्यातील सर्व नागरीक, शेतकरी, शेतमजूर , छोटे उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला कार्यालयीन सर्व नायब तहसिलदार व कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी उपस्थीत राहुन सहकार्य केले.

अ.क्र. विषय सेवा पंधरवाडयात करावयाचे कामाचे उदिष्ठ
1 शासकिय जमीनीवर सन 2011 पूर्वीचे रहीवास प्रयोजनार्थ अतिक्रमीत घरे नियमाकूल करणे. ग्रामीण 127
नागरी 197
एकूण :- 324
ग्रामीण 59 नागरी 27 एकूण 86
प्रस्ताव शक्ती प्रदत समिती कडे सादर
2 ग्रामीण रस्ते / पांदन रस्ते, हद्दीचे रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व विशिष्ट क्रमांक देणे गाव नकाशावर असलेले 582
अ-82, ब-140, क-360, 566 कि.मी.
गाव नकाशावर नसलेले 535
ड-381 इ-154 658 कि.मी.
एकूण :-1117 पांदन रस्ते
एकूण 1254 कि.मी. पादंन रस्ते प्रस्तावित
3 8 महाविद्यालयात / 5 मंडळात कॅम्पचे आयोजन व प्रमाणपत्र वाटप करणे उदिष्ट :- 6739 दाखले वाटप होणार पैकी पंधरवाडयात 300 दाखले आदेश देणार
शहरी महाविदयालयात शिबीर – 05
ग्रामीण शाळात शिबीर – 05
4 शेतीची आपसी वाटणी करणे कलम 85 नुसार प्रकरणात सुनावणी घेऊन आदेशाचे वाटप करणे एकूण :- 97 पैकी 67 प्रकरण प्राप्त, 25 प्रकरणात सुनावनी झाली आहे. 05 प्रकरणात आदेश देण्यात येणार
5 लक्ष्मीमुक्ती योजनेनुसार 7/12 वर कायदेशिर पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नांव नोद करणे एकूण :- 51 अर्ज प्राप्त सर्व अर्जात कार्यवाही करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button